suvichar

भुशी धरण काठोकाठ भरले

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2019 (16:20 IST)
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याचा भुशी धरण काठोकाठ भरुन वाहण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील पर्यटकांना इथे येण्याचे वेध लागतात. पावसासोबतच या ठिकाणी धुक्याचे प्रमाण देखील बरेच असल्याने मुंबईकर आणि पुणेकरांची या ठिकाणी दरवर्षी गर्दी पहायला मिळते.
 
पुणे आणि मुंबईचे पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण काठोकाठ भरण्याची वाट पाहत असतात. शुक्रवारपासून मुंबई आणि पुणे परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भुशी धरण परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. जोरदार पावसाचा फटका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूकीला बसला असून वाहतूक संथगतीने सुरू आहे. मात्र त्याचवेळी भुशी धरण भरल्याने पर्यटक पावसाचा आनंद लुटण्याबरोबर धरणाच्या सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणासाठ्यात वाढ झाली. सोमवारी सकाळपासून धरण काठोकाठ भरुन वाहू लागले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवीन

नागपूर ते इंदूर, बंगळूरु आणि दिल्ली विमानसेवा स्थगित; वाढत्या एटीएफ दरांमुळे विमान कंपन्यांचा निर्णय

Lava Bold N2 5G : भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी, अँड्रॉइड 16 आणि 120Hz डिस्प्लेसह लॉन्च

पीव्ही सिंधूची प्रभावी कामगिरी, एकतर्फी विजयासह उपांत्य फेरी गाठली

महिला टी20 विश्वचषक 2026 आजपासून सुरू होणार; बारा संघ विजेतेपदासाठी खेळणार

LIVE: राज्य सरकारने ॲप-आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली

पुढील लेख
Show comments