राज्यातील शेतकर्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. शेती व फळबागांचे नुकसान झाले असल्याने सरकारने 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांना 3501 कोटी नुकसान भरपाई. सोमवारपासून ही मदत बँक खात्यात जाणार आहे.
मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला. यात जुलैमध्ये 5 लाख 87 हजार 466.41 तर ऑगस्टमध्ये 1 लाख 40 हजार 331.44 असे 7 लाख 36 हजार 133.38 हेक्टर जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.