बीएमसी निवडणुकीपूर्व उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाशी संबंधित असलेले विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकरांनी शिवसेना युबीटी पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावरील असंतोषामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे चर्चेत आहे.
विनोद घोसाळकर हे उत्तर मुंबईतील शिवसेना युबीटीचे नेते असून त्यांचे ठाकरे कुटुंबाशी चांगले आणि वैयक्तिक संबंध आहे. तर त्यांची सून तेजस्वी या दिवणगत शिवसेना युबीटीचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहे. अभिषेक यांची एका लाईव्ह शो दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
तेजस्वी या शिवसेना युबीटी दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला शाखेच्या प्रभारी होत्या त्यांनी राजीनामा व्हाट्सअप वरून ब्लॉक प्रभारींना पाठवला आहे. त्यांनी राजीनाम्यात स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, मी दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून अनेक पक्षपदाधिकारी मला त्रास देत होते. मी या विषयावर माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना संदेश पाठवल्या नंतर देखील त्यांनी माझ्या संदेशांकडे दुर्लक्ष केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शिवसेना शिंदे किंवा भाजपच्या गटात प्रवेश करू शकतात.
तेजस्वी यांच्या राजीनाम्याची माहिती मिळतातच तेजस्वी यांना राजीनामा परत घेण्यासाठी मातोश्रीवर बोलवण्यात आले. तेजस्वी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतील.