Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरे गटाला मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकरांनी पक्षातून राजीनामा दिला

Webdunia
मंगळवार, 13 मे 2025 (18:47 IST)
बीएमसी निवडणुकीपूर्व उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाशी संबंधित असलेले विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकरांनी शिवसेना युबीटी पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावरील असंतोषामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे चर्चेत आहे. 
ALSO READ: राज ठाकरे यांनी संबंध पुढे नेण्यासाठी पुढाकार घ्यावा संजय राऊत यांची ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रतिक्रिया
विनोद घोसाळकर हे उत्तर मुंबईतील शिवसेना युबीटीचे नेते असून त्यांचे ठाकरे कुटुंबाशी चांगले आणि वैयक्तिक संबंध आहे. तर त्यांची सून तेजस्वी या दिवणगत शिवसेना युबीटीचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहे. अभिषेक यांची एका लाईव्ह शो दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 6 महत्त्वाचे निर्णय
तेजस्वी या शिवसेना युबीटी दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला शाखेच्या प्रभारी होत्या त्यांनी राजीनामा व्हाट्सअप वरून ब्लॉक प्रभारींना पाठवला आहे. त्यांनी राजीनाम्यात स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, मी दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून अनेक पक्षपदाधिकारी मला त्रास देत होते. मी या विषयावर माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना संदेश पाठवल्या नंतर देखील त्यांनी माझ्या संदेशांकडे दुर्लक्ष  केले.  
ALSO READ: 15 मे पासून नाशिकमध्ये राज ठाकरे यांचे मिशन महापालिका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या शिवसेना शिंदे किंवा भाजपच्या गटात प्रवेश करू शकतात.
तेजस्वी यांच्या राजीनाम्याची माहिती मिळतातच तेजस्वी यांना राजीनामा परत घेण्यासाठी मातोश्रीवर बोलवण्यात आले. तेजस्वी लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतील. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

२७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार, देशातील १४ राज्यांमध्ये वादळासह पावसाचा इशारा जारी

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

म्यानमारपासून कच्छपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले

लखनऊमध्ये चालत्या बसला भीषण आग लागल्याने ५ जण जिवंत जळाले

पुण्यात गुंडांसोबत मटण पार्टी केल्याबद्दल पाच पोलिस निलंबित

पुढील लेख
Show comments