Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मोठी बातमी !अँटिलिया प्रकरणात मोठा खुलासा,मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाख दिले गेले

मोठी बातमी !अँटिलिया प्रकरणात मोठा खुलासा,मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाख दिले गेले
, बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (14:41 IST)
अँटिलिया प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एक मोठा खुलासा केला आहे. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाख रुपये देण्यात आल्याचे एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयाला सांगितले. तपास यंत्रणेने या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांची मागणी केली. यापूर्वी, विशेष न्यायालयाने एनआयएला 9 जून रोजी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. एनआयएने विशेष न्यायालयाला सांगितले की, या खटल्यासाठी कोणी निधी दिला आहे हे शोधणे आवश्यक आहे.
 
एजन्सीने न्यायालयाला असेही सांगितले की 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. एक पथकही तपासासाठी दिल्लीला गेले आणि बयान नोंदवले. या प्रकरणात आतापर्यंत माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे  यांना अटक करण्यात आली आहे.  
 
25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराच्या बाहेर स्फोटकाने भरलेली एसयूव्ही सापडल्यानंतर हीरेनने दावा केला होता की ही कार त्याच्याकडे होती. परंतु यानंतर हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी सापडला.
 
या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांचा समावेश आहे. एनआयए ने निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल केले नसल्याचा दावा करणाऱ्या वाझे यांच्या डिफॉल्ट जामीन अर्जावरही न्यायालय युक्तिवाद ऐकेल. एएनआयएच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत ज्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. अंबानींच्या सुरक्षेत बिघाड आणि मनसुख हिरेन च्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन अधिकारी, एका कॉन्स्टेबल आणि एका क्रिकेट बुकीसह चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बांगलादेशातून आणून मला बुधवार पेठेत ठेवलं, देहविक्रीसाठी दबाव टाकण्यात आला'