शिवसेना नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित दापोलीतील दोन रिसॉर्टवर कारवाई करत, ती जमीनदोस्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर तब्बल ६३ लाखांचा दंडही आकारण्यात येणार असल्याचे समजते आहे.
संबंधित पथक दापोलीत दाखल झाले असून अनिल परबांच्या साई रिसॉर्टवर छापेमारी सुरु करण्यात आली आहे. माजी परिवहन मंत्री व तात्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप असलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी केंद्राच्या तज्ञ समितीने रिसॉर्टवर कारवाई करून तोडण्याची शिफारस केल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याने बहुचर्चित असलेल्या व सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या साई रिसॉर्टवर आता कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला आता नंबर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडणार, असे सोमय्या यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट केले आहे. या सोबत त्यांनी २२ ऑगस्ट रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून आलेले पत्रही ट्विट केले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा या कथित प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे कोस्टल झोन अॅथॉर्टी सेक्रेटरी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे पत्र देण्यात आले आहे.
ईडीनं परबांच्या साई रिसॉर्टवर धाड टाकत चौकशी सुरु केली आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे.अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. परबांच्या मुंबई प्रमाणे पुण्यातील निवासस्थानी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याची चर्चा आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित रत्नागिरीतील दापोली येथील दोन रिसॉर्ट पाडण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या संयुक्त समितीने केली आहे. मात्र, अनिल परब यांनी मात्र या रिसॉर्टची मालकी नाकारली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याने बहुचर्चित असलेल्या व सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या साई रिसॉर्टवर आता कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.