Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत
, बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (13:32 IST)
महाराष्ट्रातील सर्वात मोठया बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. व हे आयोजन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात ही बैलगाडा शर्यत होणार आहे. तसेच ही बैलगाडी शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच बैलगाडीच्या मालकाला एक 1BHK फ्लॅट मिळेल.

आता पर्यंत बैलगाडी विजेत्याला गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात यायची. म्हणून आता ही शर्यत जिकणाऱ्या व्यक्तीला 1BHK फ्लॅट देण्यात येईल. व ही शर्यत महाराष्ट्रात सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजन करण्यात आली आहे. ही शर्यत महाराष्ट्रातील सर्वात मोठी शर्यत असणार आहे म्हणून महाराष्ट्रभर या शर्यतीची चर्चा सुरु झाली आहे.

दिनांक 17 फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला सात आणि पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून ही शर्यत आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य सोबत कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून 200 हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीतील इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस असणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी 10 एकरांवर मैदान तयार करण्यात आले आहे. व या स्पर्धेला पहायला येण्यासाठी कमीत कमी एक लाख प्रेक्षकांची आसान व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती शरद फउंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे. 
 
जयंत पाटील यांच्या नावाने जयंत केसरी ही बैलगाडा शर्यत गेल्या वर्षी सुरु केली. तसेच पहिल्या पर्व उत्कृष्ट आणि योग्य नियोजनात पार पाडलं आहे. "शरद लाहीगडे फाउंडेशन हे जयंत पाटील यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाने चालत आहे. शेतकरी राजाला चांगले दिवस आले पाहिजेत आणि गोसंवर्धन झालं पाहिजे म्हणून आम्ही या जयंत केसरी मैदानाला सुरुवात केली. तसेच  गेल्या वर्षीच आम्ही ठरवलं होतं की दुसरं पर्व हे आगळं वेगळं असेल. महाराष्ट्रात मोठ्या स्पर्धा झाल्या.तसेच  आमच्या स्पर्धेत वन बीचएचके फ्लॅट देण्यात येणार आहे. या वस्तुचे मूल्य वाढत आहे. म्हणून ही गोष्ट देण्यामागे खूप विचार केला आहे. तसेच या वस्तूमुळे शेतकऱ्याचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे घर भाड्याने दिलं तरी त्याला सात हजार भाडे मिळू शकते. 20 लाखांचा फ्लॅट असला तरी त्याची किंमत 25 लाखांपर्यंत वाढू शकते," अशी माहिती शरद लाहीगडे फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी सांगितले. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहावी बारावी पेपरवर बोर्डाचा निर्णय