rashifal-2026

भाजपला धक्का या आमदाराचा राजीनामा, भेटणार राहुल गांधी यांना

Webdunia
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:59 IST)
भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधार्भातील भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. राजीनामा हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडेपाठवला आहे. ईमेल आणि फॅक्सद्वारे त्यांनी हा राजीनामा पाठवला अशी माहिती समोर येते आहे. आशिष देशमुख नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे आमदार आहेत.आशिष देशमुख काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून ते राहुल गांधी यांना भेटणार आहे. वर्धा येथे राहुल गांधींची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. वर्ध्याला होणाऱ्या काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला आशिष देशमुख हजेरी लावणार आहेत.विदर्भातील नाना पटोले यांच्यानंतर आशिष देशमुखही आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख नाराज होते. वेगळ्या विदर्भासाठी ते आग्रही होते. वेगळ्या विदर्भासाठी कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते नाराज होते.त्यामुळे आता भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देत आणि येत्या काळात पेट्रोल आणि इतर कारणानी जर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली तर मग भाजपला मोठा धक्का बसणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: नंदुरबार जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले

इस्रायल यापुढे इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले

सीएसकेसाठी वाईट बातमी, ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर

विश्वचषकात या दिवशी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असून, भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले

इराणचा महिला फुटबॉल संघ ऑस्ट्रेलियाहून परतला

पुढील लेख
Show comments