Dharma Sangrah

डॉक्टर मारहाण प्रकरण भाजपा नगरसेविकेला अटक करा अन्यथा राज्यात काम बंद आंदोलन

Webdunia
शुक्रवार, 15 मार्च 2019 (08:52 IST)
पुणे येथील भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्यावर महिला डॉक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास कामबंद ठेवणार असल्याचा इशारा मार्डच्या डॉक्टरानी सरकारला दिला. पुणे येथील  ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र लिहीत हा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात ससूनच्या महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, मंगळवारी रात्री स्नेहल या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये रुग्णावर उपचार करत असताना कोंढरे यांनी तेथे येऊन त्यांना तातडीने त्यांच्याशी संबंधीत रुग्णावर उपचार करण्यास सांगितले होते,  त्यावर स्नेहल यांनी त्या रुग्णाच्या डोक्यात टाके घातले असून सी टी स्कॅनसाठी पाठवायचे आहे असे सांगितले. या उत्तरावर चिडलेल्या नगरसेविकेने तुझी तक्रार वरिष्ठांकडे करते सांगून मोबाईल कॅमेराद्वारे चित्रीकरण करायला सुरुवात केली, त्यावेळी डॉ. स्नेहल यांनी त्यांना थांबायला सांगितले, त्यावेळी कोंढरे यांनी  त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी देखील  दिली आहे. दरम्यान कोंढरे यांचा मुलगा पृथ्वीराज सचिन कोंढरे यांच्याकडून झालेल्या अपघातामध्ये संबंधित रुग्ण जखमी झाला होता. राज्यातील डॉक्टरांनी जर आंदोलन केले तर त्याचा मोठा फटका राज्यातील अनेक रुग्णांना बसणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या वकिला कडून साहिल गोयलला १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस

वसंतराव नाईक जयंती: आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणारे 'महानायक'

आयपीएल क्रिकेटपटू शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस शैलेश सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

1July New Rules: 1 जुलैपासून हे सहा प्रमुख आर्थिक नियम बदलणार

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारचा १ जुलैपासून 'हा' मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments