Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नव्या वर्षात राज्यात भाजप सरकार येणार : नारायण राणे

Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:04 IST)
महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची रि ओढत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलल खर होईल अशी पुष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.सावंतवाडीत भाजपच्या बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
रत्नागिरीत जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव हा धक्का आहे का असे विचारताच राणे यांनी आम्ही याला धक्का मानत नाही. मीच सर्वाना धक्के देत असल्याचे राणे यांनी सागितले.
एसटीच्या संपाला भाजपचा पाठींबा आहे. मात्र सरकारने आता काय तो निर्णय घेतला पाहिजे. ४० आत्महत्या होईपर्यंत सरकार काय करत होते असा सवाल करत राणे म्हणाले एसटी कर्मचार्‍यांरी आंदोलना बाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असेही राणे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा एवढे दिवस संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या घरची परिस्थिती भयावह आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न खेळवतंय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत. हा प्रश्न त्वरित मिटववा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे आदेश केंद्राने द्यावेत. मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन. यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन, असं नारायण राणे म्हणाले. तसेच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलेन, असेदेखील त्यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments