Marathi Biodata Maker

तेजस ठाकरे यांचे भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडून कौतुक

Webdunia
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (16:22 IST)
महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे यांचे भाजप नेते आशिष शेलार यांनी कौतुक केले आहे. यात त्यांनी महाराष्ट्राची मान उंचावणारे काम केले असल्याचे म्हटले आहे. 
 
तेजस ठाकरे यांनी अंबोली गावमधील हिरण्यकशी नदीमध्ये नुकतीच माश्याची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या माशावर सोनेरी रंगाचे केस आहेत. असे केस असणारी माशाची ही २० वी प्रजाती आहे. तेजस ठाकरेंनी शोधलेली माशांची ही चौथी प्रजाती आहे. याआधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पाली आणि खेकड्यांच्या दुर्मिळ प्रजाती शोधल्या होत्या. याबद्दल आशिष शेलार यांनी  ट्विट करत तेजस ठाकरे यांचे कौतुक केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे. ग्रेट!'
 
विशेष म्हणजे शेलार यांनी तेजरी ठाकरे यांच्यासदंर्भातील सामनातील बातमी आपल्या अकाउंटवरुन शेअर करत तेजस यांचे कौतुक केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आपली पहिली मालिका जिंकली

सीरियातील महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात ३५ जण ठार

कारगिल विजय दिन का साजरा केला जातो, या खास गोष्टी जाणून घ्या

LIVE: देवेंद्र फडणवीस केंद्रीय शिक्षणमंत्री होणार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा दावा

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, राष्ट्रपतींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला

पुढील लेख
Show comments