Festival Posters

भाजप आमदाराच्या लाचखोर भावास अटक

Webdunia
शनिवार, 3 एप्रिल 2021 (15:55 IST)
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोर लिपिक संजय पटेल हे नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत, हे विशेष.
 
नळजोडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यांच्याकडे संजय पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाती. त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल यास १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
 
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने संजय वनारसीभाई पटेल (वय 45) यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून शुक्रवारी सायंकाळी (ता.२) सापळा रचला. त्यानुसार पथकाने त्यांना तक्रादाराकडून लाच स्वीकारताना अटक केली. संजय पटेल हे आमदार देवयानी फरांदे यांचे सख्ख्ये भाऊ आहेत, हे विशेष. याप्रकरणी पुढील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चालू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

पेन्सिलपेक्षाही पातळ स्मार्टफोन! Tecno चा २४GB रॅम आणि ५०MP कॅमेऱ्यासह भन्नाट स्मार्टफोन लाँच

Mumbai Weather आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत पोहोचू शकतो

अजनी-पुणे वंदे भारत ट्रेनमधून 22.57 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरी, महिला आरोपीला अटक

EPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! व्याजाची रक्कम लवकरच जमा होणार; बॅलन्स कसे तपासावे जाणून घ्या

१ ऑगस्टपासून भंडारा एसटी बसच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य

पुढील लेख
Show comments