Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचा छगन भुजबळांना झटका; समीर भुजबळांना तातडीने मंत्रिपद देण्यास नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त करत राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांनी महायुतीसमोर एक कडक अट ठेवली होती. राज्यसभेचा अर्ज भरण्यापूर्वी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तातडीने राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, अशी ही अट होती.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला होता. यावर फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत (दिल्लीत) चर्चा केली. दिल्लीहून आलेल्या निरोपानंतर भाजप नेतृत्वाने समीर भुजबळ यांना तातडीने मंत्रिपद देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याऐवजी, आगामी काळात जेव्हा कधी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होईल, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातून समीर भुजबळांना मंत्रिपद देऊ शकते, असा पर्याय भाजपने दिला आहे.
 
भाजपने ही अट फेटाळल्यामुळे छगन भुजबळ आता काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून महायुतीमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात 'ड्रग्जबाबत शून्य सहनशीलता' मोहीम सुरू