Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा : किशोरी पेडणेकर

BJP's Jan Ashirwad Yatra is a Yatra of deception: Kishori Pednekar Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
, सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (08:34 IST)
भाजपच्या जन आर्शीवाद यात्रेवरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांनी भाजपची खिल्ली उडवली होती. पुन्हा एकदा महापौरांनी भाजपवर निशाणा साधलाय.‘भाजपची जन आशीर्वाद यात्रा ही फसवणुकीची यात्रा आहे. भाजप काय करत आहे याची लोक साक्ष देत आहे. ते योग्य वेळी त्यांचा आर्शीवाद देतील,अशी खोचक टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.‘त्यांना खरोखर काम करायचे असे तर त्यांनी लोकांसाठी कोविड लस द्यावी’,असेही महापौर पुढे म्हणाल्या.  
 
केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागलेल्या भाजपच्या चार मंत्र्यांची राज्यातील विविध भागात जन आर्शीवाद यात्रा सुरू होणार होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १९ ऑगस्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृर्तीस्थळाला भेट देण्यासाठी येणार होते. मात्र त्या आधी ही जन आर्शीवाद यात्रा नाही तर ही जन छळवणूक यात्रा असल्याचे म्हणत महापौरांनी भाजपची चांगलीच खिल्ली उडवली होती. जनता भाजपला वैतागली आहे त्यामुळे जन आर्शीवाद मिळणार नाही, अशी टीका महापौरांनी केली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोलापुरातील तरुणीची मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेसाठी निवड