Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु

Webdunia
शनिवार, 7 जानेवारी 2023 (21:22 IST)
येत्या 30 जानेवारीला होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुख नेमले आहेत. या प्रमुखांवर पक्षाची निवडणूक यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबवून उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
 
भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबरला महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक तर  नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक घोषित केली आहे. 
 
सध्या विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नामनियुक्त १२ आणि सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली-सातारा, नांदेड,यवतमाळ, जळगाव, भंडारा- गोंदिया या ९ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपचे विधान परिषदेत २२ इतके संख्याबळ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ कमी आहे. विधान परिषदेत आघाडीचे २८ सदस्य आहेत. संख्याबळ कमी असल्याने भाजपने  आतापर्यंत विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक टाळली आहे.  भाजपला आता  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संख्याबळ वाढविण्याची संधी आहे. त्यामुळे भाजपने आपली शक्ती पणाला लावली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

अजित पवारांनी लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप केले

पुढील लेख
Show comments