suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

Dehu Road area
पुण्यातील देहूरोड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात भाजपचे स्थानिक कार्यकर्ते रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय परिसरात घडली. रेड्डी हे मित्रासोबत कपडे घेण्यासाठी गेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी जवळून अनेक गोळ्या झाडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने आधार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ALSO READ: बापरे! पुणे स्थानकात वंदे भारत ट्रेनचा भीषण अपघात
पुढील तपासासाठी मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे. घटनेनंतर देहूरोड बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली.पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bengal Election Voting:सकाळी ९ वाजेपर्यंत १८% मतदान; भाजप कार्यकर्त्याला मारहाण