Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराचा गळफास

boyfriend
अहमदनगर , गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (10:03 IST)
अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यामध्ये प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने देखील आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोघांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
 
मृतक मुलगी ही १६ वर्षांची होती, तर मुलगा देखील १७ वर्षांचा आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी देखील एकाच दिवशी आत्महत्या केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मात्र, मुलीने आत्महत्या का केली याविषयी आणखी माहिती मिळू शकली नाही. पण या मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळातच मुलाने देखील गळफास घेत आयुष्य संपवले आहे. आपल्या प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मुलाला मिळाली.
 
प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने मुलाने आपल्या शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप खासदार गौतम गंभीर यांना पुन्हा ''ISIS Kashmir'च्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या