Maharashtra Breaking News Live in Marathi : महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदलाची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या केंद्राने २२ ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज जारी केला आहे. यानुसार, मुंबई आणि ठाण्यात १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यात २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी काही तुरळक भागांमध्ये हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.