rashifal-2026

आता एसटी महामंडळाची सुद्धा 'शयनयान बस'

Webdunia
मंगळवार, 10 जुलै 2018 (09:11 IST)
एसटी महामंडळाची विनावातानुकूलित (नॉन एसी स्लीपर) शयनयान एसटीची बांधणी आता पूर्ण झाली आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) मंजुरीनंतर लवकरच ही विनावातानुकूलित शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. याआधी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी २० जानेवारी २०१८ रोजी अत्याधुनिक वातानुकूलित शिवशाहीसोबत विनावातानुकूलित शयनयान एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली होती. 
 
महामंडळाची प्रोटोटाइप म्हणून ही बस बांधलेली आहे. पुणे येथील सीआयआरटीने प्रमाणित केल्यानंतर तब्बल एक हजार बसची बांधणी करण्यात येईल. २ बाय १ अशा प्रकारची ३० आसने या शयनयान एसटीत आहेत. ही एसटी आंतरराज्य मार्गावर रातराणीच्या जागेवर धावेल. रात्री प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा, म्हणून महामंडळाने विनावातानुकूलित शयनयान बस बांधण्याचा निर्णय घेतला होता. रातराणीच्या सध्या ६०० बस राज्यभर धावत आहेत. रातराणीच्या तिकीट दरांमध्ये विनावातानुकूलित शयनयान प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

मुंबई: सोबत राहण्यास नकार दिल्याने जिवलग मित्रावर २० वेळा चाकूने वार करत सर्वांसमोर गळा चिरला

१५ वर्षांनी लहान असलेल्या भाडेकरूच्या प्रेमात आंधळी झालेल्या सुनेने ओलांडल्या सर्व मर्यादा; सासूला दिला भयानक मृत्यू

सातारा जिल्हा परिषद निवडणूक वाद; विधान परिषदेच्या उपसभापतींची ठाम भूमिका, अधीक्षक यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

Virgin Boy Egg मुलांच्या लघवीत अंडी उकळून तयार कॉफी का पीत आहेत हे लोक? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

पुढील लेख
Show comments