Daily Horoscope
✕

क्रूझर आणि दुचाकीचा अपघात, एका तरुणासह चिमुरडीचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (17:18 IST)
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सातमोरीच्या भरवस फाटा या रस्त्यावर क्रूझर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणासह ६ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण  जखमी झाले आहेत. जखमींना निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  रात्री उशीरा हा अपघात झाल्याचे कळते. राहता तालुक्यातील जळगाव व सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे परिवार अंतापूर ताहराबाद येथे देव दर्शनासाठी क्रूझर गाडीने चालले होते. यावेळी भरवसच्या दिशेने दुचाकीवर  विलास यादव पगारे (३८) हे येत होते. या दोन्ही वाहनांची सातमोरी जवळ समोरासमोर टक्कर होऊन या अपघातात विलास पगारे (रा वेळापुर ता कोपरगाव) हे जागेवर ठार झाले. तर क्रूझर गाडी उलटी झाल्याने गाडीमधील लहान मुलगी कल्याणी बाळू घोडेराव (६) हिचा मृत्यू झाला. 
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? संजय राऊत म्हणाले, शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत

पुण्यात FDA ची मोठी कारवाई; ९३ किलो संशयास्पद मिठाई जप्त, दोन दुकानांचे परवाने निलंबित

नेपाळ मध्ये व्हॅन दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला! सुप्रिया सुळे यांनी चर्चांना दिला पूर्णविराम

पुढील लेख
Show comments