राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा असा भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव मंजूर झाल्याची माहिती आहे. परमबीर सिंग प्रकरणात ही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना घेरण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
एका गंभीर प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहायचं आणि वाटेल तसे बेछूट आरोप करायचे हे चुकीचे आहे. गंभीर प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप अशाप्रकारचा ठराव घेत असेल तर यात भाजपची वैचारिक दिवाळखोरीच समोर आल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केलाय
अनिल देशमुख यांच्या वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.