Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाराष्ट्रात तब्बल १३ हजार अंगणवाड्यांना केंद्राची मान्यता

smirti irani
, सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (09:31 IST)
महाराष्­ट्रातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.
 
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचा-यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्­या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्­यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्­ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयीसुविधांबाबत प्रश्­न विचारला.
 
त्यावर उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या, ‘मिशन पोषण २.० देशभरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी, मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्­यात येतील. महाराष्­ट्रातील १३०११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत, ५० हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजारप्रमाणे बांधण्यात येणार आहेत. प्रसूती आणि बालपण काळजी आणि विकासासाठी सक्षम अंगणवाड्या आहेत.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काशी विश्वेश्वराप्रमाणे पंढरपूर आराखड्याचे काम सुरु