Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे सोबत युतीबाबत चंद्रकात पाटील म्हणाले ..........

Chandrakant Patil
Webdunia
सोमवार, 4 जानेवारी 2021 (15:43 IST)
पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले, “मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. राज ठाकरे असो वा मनसे यांच्याबद्दल आदराने म्हटलेलं आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलं आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसे) कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत.

जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्हाला आठवतात, मंत्री आशिष शेलार म्हणाले आपण निवडकपणे बदला घेऊ

LIVE: आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त विधान केले

ठाण्यात लोकायुक्त अधिकारी असल्याचे भासवून बिल्डरकडून ८ लाखांची खंडणी मागितली, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

मल्लिकार्जुन खरगे यांच्या ' ‘स्मॉल वार’'च्या विधानावर रामदास आठवले यांनी निशाणा साधला, म्हणाले जर ऑपरेशन सिंदूर लहान असते तर...

५१ तोळे सोने, आलिशान गाडी आणि भव्य लग्न, राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू बनला चर्चेचा विषय

पुढील लेख
Show comments