Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊतांचे गुरु शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (08:25 IST)
संजय राऊत ज्यांना गुरू मानतात त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केलं.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती. या भेटीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली होती.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हात जोडायला जात असाल, तर हातातील खंजीर बाजूला ठेवा, असं राऊत यांनी म्हटलं होतं. याच टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे. शिंदे गटाच्या खंजिराला एक पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडल्यामुळे आणि ते असह्य झाल्यामुळे शिंदेंनी शिवसेना सोडली. पण त्यांचा हा आपसातला विषय आहे असे ही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments