भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील यांची पक्षाकडून फेरनिवड करण्यात आली आहे. तर, मुंबई भाजपा अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची देखील पुन्हा निवड केली गेली आहे. मंगलप्रभात लोढा हे जवळपास २५ वर्षे आमदार राहिलेले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका अगोदर या दोघांनाही पक्षाच्यावतीने ही जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड केली गेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळवून देऊ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात भाजपाची सत्ता गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच, भाजपाच्या या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे या नेत्यांचा समावेश होता. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुन्हा राज्यातील भाजपाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सोपविली आहे. तर, मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.