शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आता धक्कादायक बाब समोर येत आहे. सीबीआयच्या रडारवर असलेल्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटींच्या लाचेची मागणी करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांचे समीर वानखेडे यांनी खंडन करून समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करून आपल्याला संरक्षण मिळावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी शाहरूख खानबरोबर झालेले चॅटींग माध्यमांसमोर आणून शाहरूख खानने आपल्या मुलाच्या सोडवणूकीसाठी भीक मागीतल्याचे सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना समीर वानखेडे यांनी शाहरूख आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्य़ाचे सांगितले आहे. यासाठी त्याने शाहरूख बरोबर झालेले व्हाट्सअप चॅटिंगचे स्क्रिनशॉटही न्यायालयासमोर सादर केले आहेत.
काय बोलले शाहरूख खान आणि आर्यन खान एकमेकांशी
शाहरुख : साहेब मला तुमच्याशी बोलायचंय..प्लीज मी आता बोलू शकतो का? एक वडील म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो का ?
समीर वानखेडे : प्लीज कॉल करा…
यावेळी समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यामध्ये बोलणं झाल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.
त्यानंतर पुन्हा दुसऱ्या चॅटींगमध्ये
शाहरूख : तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या विचाराबद्दल आणि काढलेल्या उद्गाराबद्दल मी तुमचा आभारी आहे. तसेच मी खात्री देतो कि, माझा मुलगा आर्यनला मी चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन ज्याचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल. ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार असून मी तुम्हाला याची खात्री देतो. देशाला पुढे नेणारे प्रामाणिक आणि कष्टाळू तरुण आपल्याला हवे आहेत. तुम्ही आणि मी आपली जबाबदारी पार पाडली आहे, ती जबाबदारी पुढची पिढीही पाळेल. भविष्यासाठी या तरुणांमध्ये बदल घडवून आणणे आपल्या हातात आहे. आपण मला सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. अल्लाह तुम्हाला खूप आशीर्वाद देवो…
समीर वानखेडे : माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत….
शाहरुख खान : आपण एक खूपच चांगली व्यक्ती असून प्लीज माझ्या मुलावर आर्यनवर दया दाखवा…जेलमध्ये त्याच्याकडे चांगले लक्ष द्या…मला आपल्याला भेटायची इच्छा असून आपणाला जेव्हा वेळ असेल तेव्हा कळवा. आपण नक्की भेटुयात…मला मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा सदैव ऋणी राहीन.
शाहरुख खान : आर्यनला तुरुंगात टाकू नका….मी तुम्हाला विनंती करतो. तो तुरुंगात राहिला तर तो माणूस म्हणून मोडून पडेल. त्याचा आंतर्मन वेगळा विचार करेन….प्लीज मी आपल्याकडे भीक मागतो…तुम्ही त्याला तिथे जास्त दिवस ठेऊ नका….त्याला लवकर घरी पाठवा नाहीतर तो पूर्ण उद्धवस्त होऊन जाईल…तुम्हालाही माहिती आहे.. त्याच्यासोबत जरा जास्तच घडलंय….प्लीज…प्लीज…मी तुमच्याकडे एका मुलाचा बाप म्हणून भीक मागत आहे. असे म्हटले आहे. समीर वानखेडे यांच्या या नव्या पुराव्यामुळे या ड्रग्ज प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor