Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चवदार तळे सत्याग्रहाला प्रथमच सरकारी मानवंदना, क्रांतिस्तंभ परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

Webdunia
गुरूवार, 23 मार्च 2023 (08:35 IST)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. या सत्याग्रहाची दखल जगभरात घेतली गेली. तेव्हापासून लाखो अनुयायी चवदार तळे येथे येऊन महामानवाला अभिवादन करतात. या वर्षी पहिल्यांदा महाड येथे सरकारी मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच या परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल, असे आदेश रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
 
 महाड चवदार तळे सत्याग्रह, क्रांतिस्तंभ येथे १९ आणि २० मार्च या ऐतिहासिक दिवशी लाखो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. महाड येथील क्रांतिस्तंभाला सरकारी मानवंदना द्यावी, परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात यावी, अशी मागणी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेसह इतर संघटनांनी केली होती. रायगडचे  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्य सरकारने त्यास तत्काळ मंजुरी दिली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी दिली. तयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

पुढील लेख
Show comments