Marathi Biodata Maker

चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:30 IST)
राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण  यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. दरम्यान, फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत आता प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया आलीय. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल, असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावलेत.
 
फडणवीसांच्या आरोपांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना माध्यमांनी विचारलं असता माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. माझ्याकडून असं कुठलंही काम झालं नाही. व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल. मी अजून व्हिडीओ पाहिला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलीस नाही तर फॉरेन्सिक विभागत तपासतो. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही तर सरकार ठरवतं, अशी प्रतिक्रिया प्रवीण चव्हाण यांनी दिलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

शिवसेना यूबीटी संसदीय पक्षाची आज बैठक, व्हीप जारी आणि सर्व खासदारांना बोलावले

Jhansi Rani Lakshmi Bai Punyatithi 2026 Messages in Marathi झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी विनम्र अभिवादन

International Picnic Day 2026 : आंतरराष्ट्रीय सहल दिवस, रंजक इतिहास आणि महत्व

केंद्र सरकार २० जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरित करण्याची शक्यता

मैदानावर झालेल्या धक्काबुक्कीनंतर वैभव सूर्यवंशीवर कठोर कारवाई! सामनाधिकाऱ्याने मोठा दंड आकारला

पुढील लेख
Show comments