Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपति संभाजीनगर : कारखान्याला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

Chhatrapati sambhajinagar
, रविवार, 31 डिसेंबर 2023 (10:00 IST)
छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्याला आग लागली. आगीत भाजल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, आगीची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यात व्यस्त आहेत. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
 
अग्निशमनविभागाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात हातमोजे बनविण्याचा कारखाना आहे. पहाटे2.15च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती. स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितले की, पाच जण आत अडकले आहेत. आमचे अधिकारी कारखान्यात पोहोचले पण तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. आम्ही सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल. 
फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या एका मजुराचे म्हणणे आहे की, आग लागली तेव्हा आतमध्ये 10-15 कर्मचारी झोपले होते. आगीचे लोळ पाहून कामगारांमध्ये घबराट पसरली. काही लोक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले तर काही लोक आत अडकले. 
 
Edited By- Priya DIxit  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशाने देश कसा चालणार असा सवाल, शरद पवार यांचा सवाल