Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणार, महाराष्ट्र सरकारचा उपक्रम

UNESCO
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (11:12 IST)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या मागणीसह महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ फ्रान्समधील पॅरिस येथे पोहोचले आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने 'मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया' या थीम अंतर्गत युनेस्कोला प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, या प्रस्तावात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग,खांदेरी आणि तामिळनाडूमधी जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, युनेस्कोच्या दर्जासाठी राज्याची बाजू मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ शनिवारी पॅरिसला रवाना झाले.
 
भाजप नेते आशिष शेलार यांनी युनेस्कोला महाराष्ट्राचा प्रस्ताव पाठवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि जागतिक व्यासपीठावर राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
 
ते म्हणाले, “जर युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला तर पर्यटनाच्या चांगल्या संवर्धन आणि विकासाचे मार्ग मोकळे होतील. यामुळे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती देताना मंत्री शेलार यांनी लिहिले की, "महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून, पॅरिसमधील इंडिया हाऊस येथे युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा, जे जागतिक वारसा समितीचे सदस्य देखील आहेत, यांची भेट घेतली आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या12 किल्ल्यांचा समावेश करण्याचा आमचा प्रस्ताव पुढे नेल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली."
 
केंद्र सरकारने रीतसर पाठवलेला हा प्रस्ताव आता तांत्रिक चर्चेसाठी युनेस्कोच्या अधिकाऱ्यांसमोर सादर केला जाईल. आम्हाला खात्री आहे की लवकरच हे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होतील.असे त्यांनी लिहिले आहे. 
Edited By - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वडाळा येथे भरधाव कारने धडक दिल्याने 18 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी