मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत काही मंत्र्यांची नाराजगी असल्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. राज्यात माविआ सरकार कोसळाल्यांनतर शिंदे सरकारची शपथविधी समारोह झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.उर्वरित आमदारांना मंत्रिपद मिळेल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र मंत्रिपद मिळाले नाही यासाठी काही आमदार अस्वस्थ झाले आणि त्यांनी नाराजगी व्यक्त केली. त्यामुळे त्यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटले ''अशा गोष्टी घडत असतात. योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी होतील.