सध्या पुण्यात अमली पदार्थांची विक्री जास्त प्रमाणात वाढली असून ते निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील बेकायदेशीर पब वर कठोर कारवाई करत अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्याचे आदेश दिले. पुणे शहराला ड्रग्ज फ्री सिटी करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सोशल मीडियावर एक बार पब उशिरा पर्यंत उघडे असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गेल्या 48 तासांत हे पब समोर आले आहे. व्हिडीओ व्हायरल झाले असून व्हिडीओ मध्ये काही तरुण अमली पदार्थ घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ फर्ग्युसन कॉलेज रोड वरील एका बारचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पोलिसांनी तपासात कार्यक्रमाच्या आयोजकासह आठ जणांना अटक केली आहे.मद्यसाठा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने बारच्या सहा वेटर्सना अटक केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याला अमलीमुक्त शहर बनवण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.