Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Webdunia
बुधवार, 28 जून 2023 (08:10 IST)
जळगाव : खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात केल्या.
 
जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदान येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते‌. यावेळी ते म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जळगाव जिल्ह्यात ३ लाख ३ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे‌.
 
यापैकी ३५ हजार लाभार्थी उपस्थित आहेत. सततच्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले. शेतकऱ्यांना १५०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. नैसर्गिक आपत्तीसाठी आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली आहे‌. एक रूपयात पीक विमाचा निर्णय घेतला.
 
नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

खाटूश्याम मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविक जखमी

बसच्या धडकेत चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सहा मजली इमारतीला भीषण आग, 42 जणांना सुखरूप बाहेर काढले

Mass Murder पत्नी आणि 3 मुलांचा एकामागून एक गळा आवळून हत्या केली, व्यावसायिकाने केला हृदय पिळवटून टाकणारा खुलासा

खलिस्तानी दहशतवाद्याच्या धमकीनंतर राम मंदिराची सुरक्षा वाढली

पुढील लेख
Show comments