भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, नदमोद्दीन शेख याने लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार करून माझा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मी जसे सांगेन तसं केल्यास आपण खूप पैसे कमवू असे सांगितले.
त्यानंतर सुरवातीला नाशिक येथे मेहबूब शेख यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करायला सांगितली. मात्र, तेथील पोलिसांना खोटी तक्रार असल्याचा संशय आल्याने त्यांनी हाकलून दिले.
त्यानंतर नदमोद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं तरुणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांना मला खोटी तक्रार द्यायला लावली असून मला यात पडायचं नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. मात्र आता तक्रार माघे घेतल्यास जेलमध्ये सडशील, त्यामुळे एफआयआरमध्ये जसं आहे तसेच बोलायचं असे चित्रा वाघ यांनी म्हटल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यानंतर त्यांनी तरुणीचा एक व्हिडीओ बनवून माध्यमांशी कसे बोलायचं हे सांगितले, असे तक्रारदार तरुणीने म्हटले आहे.