Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही खरेदी -विक्री दस्त नोंदणी करता येणार

radha krushna vikhe patil
, गुरूवार, 4 मे 2023 (08:15 IST)
खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी, या दृष्टिकोनातून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विभागातील (मुंबई शहर, उपनगर), कोकण विभागातील  (ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड अलिबाग), पुणे विभागातील  ( सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर), अमरावती विभागातील  (अकोला, अमरावती), नागपूर विभागातील  (नागपूर), लातूर विभागातील  ( लातूर, नांदेड), नाशिक विभागातील (Nas (नाशिक, जळगाव), औरंगाबाद विभागातील  (औरंगाबाद) जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
 
महसूल विभाग अधिक जनताभिमुख करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहे. सलोखा योजना, ६०० रुपये ब्रास वाळू उपलब्ध करून देणारे नवीन वाळू धोरण, जमीन मोजणी अशा निर्णयामुळे जनतेला महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभतेने मिळत असल्याचा दावा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावं चर्चेत