Dharma Sangrah

'सीएम टू पीएम' शेतकरी आसुड यात्रा गुजरात पोलिसांनी अडविली

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (19:52 IST)
शेतीमालाला उत्पादन खर्च+50% नफा, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती,विधवा-अपंगांना दरमहा 5000/-मानधन द्या या प्रमुख मागण्यासाठी नागपूर येथून महात्मा फुले जयंतीदिनी 11 एप्रिल 2017 रोजी सुरु केलेली शेतकरी आसुड याञा गुजरातमध्ये प्रवेश करताच 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वा.पोलिसांनी अडविली.
 
बळसाणे जि.धुळे येथे सकाळी सभा झाली.नवापूर जि.नंदूरबार येथे महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर शेतकरी आसुड याञा दीड तास अडविली.दरम्यान गुजरात पोलिस मोठा फौजफाटा घेवून रस्त्यावर दाखल झाले.बारडोली येथे गुजरातच्या शेतकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.माञ तिकडे जाण्यास पोलिसांनी मनाई केली.टोलनाक्याशेजारील शेतात सर्व शेतकरी एकञ जमले असतानाच पोलिसांनी धरपकड सुरु केली.जेवण टोलनाक्यावर आलेले असतानाच पोलिसांनी प्रहारचे आ.बच्चू कडू,देवेंद्र गोडबोले,शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील,कालिदास आपेट,दिनकर दाभाडे यांना अटक केली.
 
आ.बच्चू कडूंना ताब्यात घेताच प्रहार शेतकरी संघटनेच्या सुरेखा ढवळे यांनी सहकाऱ्यांसह पोलिस कारवाईला विरोध केला.त्यावेळी पोलिसांनी अपंग महिलांनाही ओढत आणून गाडीत कोबले.कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन पोलिस व्हॅनमध्ये घातले.नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर येथे रक्तदानाला गुजरात सरकारने परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले.वेगवेगळ्या पोलिस व्हनमधुन महाराष्ट्र,गुजरातमधिल सुमारे 500 महिला,पुरुष,अपंग कार्यकर्त्यांना अटक करुन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ठेवले आहे.
कालिदास आपेट 
सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घातली

मस्जिद बंदर स्टेशनवर एका प्रवाशाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याचा आरोप मध्य रेल्वेने फेटाळला

नागपुरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्पातून सिंचनाचे पाणी तात्काळ सोडण्याचे आदेश दिले

iQOO चा 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी फास्ट चार्जिंगसह नवीन 5G फोन लॉन्च

नीट वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रल्हाद जोशी नवे शिक्षणमंत्री झाले, महत्त्वपूर्ण विधान केले

पुढील लेख
Show comments