Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाहतूक कोंडी कमी होणार, माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू

cm uddhav thackeray
, बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (08:23 IST)
मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. याआधी मुंबईतील माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेकडील डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. मात्र, भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्याने याचे उद्घाटन रद्द करण्यात आले. त्यामुळे उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएला दिले.
 
माणकोली उड्डाण पूलाच्या एका बाजूने  वाहतूक सुरू झाली आहे. हा पूल सुरु झाल्याने ठाणे-भिवंडी बायपासवर होणारी कमालीची वाहतूक कोंडी आता कमी होण्यास मदत होणार आहे. या पुलावरून वाहतूक सुरु झाल्याने नाशिककडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे मोडणारा किमान अर्धा तास वाचणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महागाईचा चटका अजून वाढला, आता अंडी पण महाग झाली