मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक शब्दांत व्यथा मांडली असताना दुसरीकडे आता त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट एकनाथ शिंदेंनी घातल्यानंतर आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच फेसबुक लाईव्हमध्ये देखील शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे, अशी भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार दोलायमान अवस्थेत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्याला ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे भाजपाकडून यावर सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.