Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ, मुशीरवाडा परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन, 101 जणांना ताब्यात घेतले

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (21:09 IST)
उत्तर गोवा : जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी मुशीरवाडा परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवित भाड्याने राहत असलेल्या बिगर गोमंतकी यांची कसून चौकशी केली. म्हापसा पोलिसांनीही आपल्या कार्यक्षेत्रात धरपकड करुन चौकशी केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी एका वृत्तपत्राला दिली  . कोलवाळ पोलिसांनी 101 जणांना ताब्यात घेऊन स्थानकावर आणले. त्यातील 39 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती. या सर्वांना सीआरपीसीअंतर्गत अटक करून नंतर म्हापसा एसडीएमसमोर हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार नाईक, कुणाल नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र सावंत, संतोष आर्लेकर व इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.
 
तब्बल 39 जणांकडे नव्हती कागदपत्रे
यासंदर्भात माहिती देताना कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक म्हणाले, मुशीरवाडा परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. गोव्यात जी-20 परिषदेच्या येत्या 17, 18 व 19 एप्रिलला बैठका होत आहेत. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार हे ऑपरेशन राबविण्यात आले. मध्यंतरी ‘लाला की बस्ती’मध्ये अशाच प्रकारे मोहीम राबविली होती. या मोहिमेचा असा उद्देश होता की, विविध राज्यांतून लोक गोव्यात येऊन वास्तव्य करतात. मात्र त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे किंवा इतर दस्तावेज नसतात आणि अनेकदा या बिगरगोमंतकीयांचा मोठ्या गुन्ह्यांमध्येही समावेश असतो, त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे गरजेचे असते. कोलवाळमध्ये अशा 101 जणांना ताब्यात घेऊन स्थानकावर आणले असता त्यातील 39 जणांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना अटक करण्यात आली.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments