Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार

Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (07:50 IST)
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू  यांनी दिली. तर शिंदे गटाकड़ून व्हीप जरी करण्यात आला होता. त्यांनीही 16 आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेने (Shivsena)39 आमदारांविरोधात व्हिपचे पालन न केल्याने तक्रार दाखल केली आहे. तर शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. तर शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्ष नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

बारामतीत पंतप्रधान मोदींची 'नो एंट्री'! अजित पवारांच्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

गोंदियातील काँग्रेस उमेदवार निवडणूक प्रचारात व्यस्त, घरात पडला दरोडा

मोठा अपघात टळला, रेल्वेचे 3 डबे रुळावरून घसरले

एकनाथ शिंदे यांनी पुण्यात व्हीबीएचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली

महाराष्ट्रः खऱ्या-खोट्याच्या लढाईत अडकले उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे-अजितपवार

पुढील लेख
Show comments