Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कंम्बाईन्ड डिफेन्स सिर्व्हिसेस परिक्षा पुर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

कंम्बाईन्ड डिफेन्स सिर्व्हिसेस परिक्षा पुर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
, मंगळवार, 13 जून 2023 (20:15 IST)
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परिक्षेच्या पूर्वतयारी साठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे 19 जून 2023 त 01 सप्टेबर 2023 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 61 चे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक  उमेदवारांनी 16 जून 2023 रोजी  सकाळी 10.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे.
 
या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.  मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी Department of sainik welfare,pune (DSW) यांच्या www.mahasainik@maharashtra.gov.in या संकेस्थळावरून (Other-PCTC Nashik CDS-61) या कोर्ससाठी  संबंधित परिशिष्टांची प्रिंन्ट घ्यावी. त्यावरील संपूर्ण माहिती भरून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथून प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांवर स्वाक्षरी घेऊन मुलाखतीस उपस्थित रहावे.
 
याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक येथे प्रत्यक्ष अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी कळविले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिपरजॉय चक्रीवादळ रौद्ररूप दाखवणार,का येतात चक्री वादळे, वाचूया पूर्ण माहिती