महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे तर्फे सीईटीचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाच्या पदवी तसेच पदव्युत्तर परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकानुसार येत्या ३ ऑक्टोबरपासून परीक्षेला सुरवात होणार आहे. यासंबंधी अधिक माहिती ‘सीईटी सेल’च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण विभागाच्या चार सीईटी परीक्षा तसेच उच्च शिक्षण विभागाच्या आठ सीईटी परीक्षा होणार आहेत. या सर्व परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे ‘सीईटी सेल’ने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमाचे पालन करून परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांची माहिती, ओळखपत्र व संबंधित इतर सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सबबीवर प्रवेश दिला जाणार नसल्याचे ‘सीईटी सेल’ स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी.
असे आहे वेळापत्रक
एम-आर्क सीईटी – ३ ऑक्टोबर २०२०
एमसीए – १० ऑक्टोबर २०२०
बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर २०२०
एम-एचएमसीटी – ३ ऑक्टोबर २०२०
एमपीएड – ३ ऑक्टोबर ( ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान फिल्ड टेस्ट )
एमएड – ३ ऑक्टोबर २०२०
बीएड – १० ऑक्टोबर २०२०
एलएलबी ( पाच वर्ष अभ्यासक्रम ) – ११ ऑक्टोबर २०२