Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नोटबंदीविरोधात आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार

notebandi
नागपुरमध्ये नोटबंदीविरोधात आंदोलन कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून आरबीआयच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. नोटबंदीचा विरोध करण्यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये काँग्रेसनं घेराव आंदोलन केलं. 
 
आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते. पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विलास मुत्तेमवार यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रावर उतरलेला शेवटचा अंतराळवीर कमांडर युजेन सेरननचे निधन