Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोनाचा फटका महालक्ष्मी व जोतिबा या मंदिरालाही बसला

कोरोनाचा फटका महालक्ष्मी व जोतिबा या मंदिरालाही बसला
, गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (08:37 IST)
कोरोनामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीअंतर्गत करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या मंदिरातील सोने-चांदी दानामध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत पावणे ४३ लाख रुपयांची घट झाल्याची माहिती देण्यात आली.
 
दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती महालक्ष्मी ज्योतिबा मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकन करते. करोनामुळे यावर्षी मुल्यांकनात उशीर झाला होता. यंदा महालक्ष्मी चरणी १९१ तोळे सोने तर अठरा किलो चांदीचे दागिने आणि ज्योतिबा चरणी २८ तोळे दागिने व आठ किलो चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले. याची किंमत ८३ लाख ७६ हजार रुपये आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१९-२० मध्ये ४२ लाख ७१ हजार रुपयांची घट झाली आहे,असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला : सयाजी शिंदे