Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले ,-आरोग्य मंत्री राजेश टोपे

Corona infection among children increased
, शुक्रवार, 7 मे 2021 (21:50 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला आहे सर्वीकडे कोरोनाचे संसर्ग सातत्याने वाढत आहे. या आजारापासून कोणीही वाचले नाही सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला असून आता हा आजार लहान मुलांना आपल्या वेढ्यात घेत असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
सध्या सर्वीकडे दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होतं असून कोरोनाची तिसरी लाट येण्याचे वक्तव्य केंद्राच्या वैज्ञानिकांनी दिले आहे. यासाठी पूर्वी पासूनच सावधगिरी बाळगली पाहिजे त्या साठी राज्यात बाल रोग तज्ज्ञाची टास्क फोर्सची स्थापना करण्यात येईल.असे आरोग्य मंत्री म्हणाले.
या टास्क फोर्स मध्ये मुलांकडे जातीने लक्ष दिले जातील तसेच त्यांच्या वर योग्य उपचार करून त्याची विशेष काळजी घेतली जाईल ,असे ही ते म्हणाले. अतिरिक्त बेडची संख्या वाढवण्याकडे तसेच व्हेन्टिलेटर्स, अति दक्षता विभागातील बेड्स ची संख्या वाढविण्याकडे देखील लक्ष दिले जातील. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बाल रोगतज्ञांशी संवाद साधला अशी माहिती टोपे यांनी दिली.    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना पुणे : आकड्यांच्या घोळामुळे पुण्यात अधिक अॅक्टिव्ह रुग्ण?