Marathi Biodata Maker

सागरी किनारी मार्ग कोस्टल रोडचे काम होणार स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

Webdunia
सोमवार, 6 मे 2019 (16:26 IST)
मुंबई येथे सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांस दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली असून, मागील अनेक दिवसांपासून अडकून पडलेले कोस्टल रोडचे काम मुंबई महापालिकेला पुन्हा सुरु करणार आहे. कोस्टल रोड प्रकरणी. २३ एप्रिल रोजी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामांस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याच निर्णयाविरोधात पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या बाबतच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यालयाने समुद्रात भर न टाकण्याच्या अटीवर महापालिकेला या कामासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनापा आता या रोडचे काम सुरु करू शकणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाने दिलेल्या निर्णयामध्ये कोस्टल रोडचे बांधकाम करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे मत नोंदवले आहे. तर त्या संधर्भात सुनावण्या जून महिन्यामध्ये होणार आहेत. बांधकाम थांबवून ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यालयाने पालिकेला पावसाळ्याच्याआधीच बांधकाम सुरु करण्याची परवाणगी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने न्यालयात दाखल केलेल्या अर्जामध्ये, मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) चांगला उपाय असून नागरीकांना सामना कराव्या लागणाऱ्या वाहतूक समस्या हाताळण्यासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधांवरील समस्येवर हा कोस्टल रोड चांगला पर्याय आहे,’ असं स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

CWG 2026 Boxing: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच आणि अंकुश यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंगचे सुवर्णपदक, तर मनू भाकरने विश्वचषकात कांस्यपदक पटकावले

रशिया पाच लाख सैनिकांची भरती करणार, झेलेन्स्कींच्या दाव्यांमुळे खळबळ

IND vs SL Test:श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ जाहीर

LIVE: पुण्याला वाहतूक कोंडीतून दिलासा, इनर रिंग रोड-टनेल नेटवर्क प्रकल्पाला मंजुरी

पुढील लेख
Show comments