Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी कोल्हापूरची निवड

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (08:19 IST)
कोरोनावरील ‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने (आयसीएमआर) कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची निवड केली आहे. शिवाय या चाचणीमध्ये कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होता येणार असून या चाचणीचा कार्यक्रम तातडीने सुरू करण्यात आला आहे. 
 
‘कोव्हॅक्सिन’ या लस चाचणीचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसर्‍या आणि देशातील सर्वात मोठ्या टप्प्यालाही प्रारंभ झाला आहे. या टप्प्यामध्ये देशभरातील 25 हजार 500 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार असून यामध्ये गोव्यात क्रोम क्‍लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम या संस्थेच्या वतीने देशातील एकमेव खासगी साईट कार्यरत आहे. या साईटवर एकूण 1 हजार स्वयंसेवकांना लस चाचणीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यापैकी 250 स्वयंसेवकांना ही लस देण्यातही आली आहे. स्वयंसेवकांना लस देताना त्यांचा स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर यंत्राद्वारे तपासण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया यामध्ये अंतर्भूत आहे. हा स्वॅब तपासण्याकरिता प्रारंभी गोवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तेथे असलेल्या क्‍लोज्ड एंड  स्वरूपाच्या यंत्रामध्ये इतर दुसर्‍या कोणत्याही कंपनीचे किटस् चालत नाहीत आणि ‘कोव्हॅक्सिन’च्या चाचणीमध्ये ‘आयसीएमआर’ने विकसित केलेले किटस्च वापरणे आवश्यक होते. याप्रसंगी ‘आयसीएमआर’कडे निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हैदराबाद व राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था, पुणे हे दोन पर्याय उपलब्ध होते. तथापि ‘क्रोम’ने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मान्यता घेऊन कोल्हापूरच्या शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची गुणवत्ता पटवून दिल्यानंतर ‘आयसीएमआर’ने शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला हिरवा कंदील दाखवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments