मालेगावमधील काँग्रेस नगरसेवकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जे काही चाललयं ते मंथनाच काम आहे. त्यांचे लोक आमच्याकडे आले, आमचे लोक त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांनी आमचे थोडे फार नेलेत तर आमच्याकडेही त्यांचे जास्त लोक येणार आहेत. त्यामुळे याबाबतची नाराजी हा राजकारणातला भाग आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाचा विषय फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे वक्तव्य पटोलेंनी केले.
महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे गैरहजर राहिले. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, ऊर्जा विभागातील अडचणींचा पाढा त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर वाचला आहे. विभागात सुरू असणाऱ्या गैरप्रकारही त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहेत. त्यामुळे नाराजी नसल्याचे पटोलेंनी स्पष्ट केले. या बैठकीला ते उपस्थित राहणे अपेक्षितही नव्हते, हादेखील खुलासा त्यांनी केला.