Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी

Webdunia
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (16:56 IST)
अभिषेक घोसाळकरांचे पर्थिव दुपारी साधारण दोनच्या सुमारास घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर हे अभिषेक घोसाळकर यांचे वडील असून ते खूप रडतांना दिसले. व या वेळी  अभिषेक घोसाळकर यांची मुलगी व पत्नीने एकच टाहो फोडला. 
 
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गोळीबारात मरण पावले. व यांचे पार्थिव बोरिवलीतील त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पार्थिव साधारण दुपारी दोनच्या सुमारास घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांचे वडील धाय मोकलून रडले व त्यांची पत्नी व मुलीने एकच टाहो  फोडला. थोड्याच वेळात अभिषेक घोसाळकर यांच्यावर बोरिवलीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 
अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. ते मुंबईतील दहिसर इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र होते. 
 
उद्धव ठाकरे यांनी उपस्थिति दिली- 
उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी पोहोचले. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची अशी धक्कादायक हत्या झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा घोसाळकरांच्या घरी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच उद्धव ठाकरे व ठाकरे गटाचे सर्व नेते हे घोसाळकरांच्या निवास्थानी समोर असलेल्या एका हॉलमध्ये उपस्थित होते. 
 
अंगरक्षक अमरीश मिश्राच्या बंदुकीनं मॉरिस नोरोन्हाने घोसाळकरांवर गोळीबार केला. मॉरिसने पाच गोळ्या अंगरक्षकाच्या बंदुकीनं झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर झाडल्या. व मॉरिसने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. 
 
फेसबुक लाईव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. फेसबुक लाईव्हदरम्यान हा सर्व प्रकार घडला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची आज रविवारी नऊ उमेदवारांची यादी जाहीर,फहाद अहमद यांना उमेदवारी

नवी मुंबईत अमली पदार्थसह चौघांना अटक 20 लाख रुपयांचे साहित्य जप्त

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विकसित महाराष्ट्र आवश्यक, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

समुपदेशन सत्रादरम्यान मुलीने शिक्षकाने विनयभंग केल्याचे सांगितले, आरोपी शिक्षकाला अटक

4 महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला,आरोपी प्रियकराला अटक

पुढील लेख
Show comments