Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दादा भुसे यांनी केले शरद पवारांचे कौतुक

Shiv Sena leader and State Minister for Ports and Mines Dada Bhuse
, सोमवार, 8 मे 2023 (21:35 IST)
राज्यात सध्या राजकीय वाद – विवाद हा चर्चेचा विषय आहे. एकही नेता दुसऱ्या नेत्याबद्दल बरं बोलताना दिसत नाही. मात्र नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादीमधील अध्यक्षपदाचा वाद हा त्यांचा अंतर्गत वाद असल्याचं म्हणत शरद पवार यांच्या नेतृत्वाचं देखील कौतूक केलं.
 
अजित पवार आणि अनेक नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातच तयार झाले आहेत, असे सांगत दादा भुसे यांनी बाजूलाच बसलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे इशारा करत झिरवाळ यांचे नेतृत्व देखील शरद पवार यांच्याच मार्गदर्शनात तयार झाल्याचे सांगितले.
 
दैनिक ‘सामना’च्या  अग्रलेखात शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. त्याबबद्दल दादा भुसे यांना नाशिकमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मंत्री भुसे म्हणाले, या प्रश्नावर माझ्या सारख्या कार्यकर्त्याने बोलणे उचित होणार नाही.

Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरेंनी भूमिका बदलली, आता म्हणाले सीमाभागातील मराठी उमेदवारांना निवडून द्या